आज चंद्रपूर शहरात रन फॉर युनिटी दौड आयोजित करण्यात आली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत असलेले 'वंदे मातरम्' या गीतरचनेलाही १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. हेच औचित्य साधून रन फॉर युनिटी आयोजित करण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी सर्वधर्मीय प्रमुख होते. शहर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांनी आजच्या रॅलीत सहभाग घेतला. चार कदम देश के नाम या घोषवाक्यासह राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली.