साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गड येथील चैत्रोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक वणी गडाकडे पायी निघाले आहेत. भर उन्हातही श्रद्धेच्या जोरावर भाविकांचा प्रवास अखंड सुरू असून, दुपारच्या तीव्र उन्हाचा काही काळ टाळून यात्रेकरू पुढे सरकत आहेत.