चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव आता 'कुल' होणार आहे. मासोळ्यांना पानांची शीतल सावली मिळणार आहे. तलावात झाडांची पानं टाकण्याची मोहीम आजपासून सुरू होणार आहे. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात गेल्या पाच दिवसांपासून हजारो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.