बुलढाणा शहराच्या शेवटच्या टोकावर आणि अगदी जंगलाला लागून असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अनेकदा अस्वल, बिबट अशा हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याच पाहायला मिळालं.. परंतु गेल्या महिनाभरापासून या परिसरात कुठलाही प्राणी आढळून आला नव्हता , मात्र रात्रीच्या सुमारास याच म्हाडा कॉलनी परिसरात एक नव्हे तर तब्बल तीन भले मोठे अस्वल मुक्त संचार करताना आढळून आले आहेत, स्थानिक नागरिकांनी त्यांचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद केला असून नागरिकांनी बाहेर फिरताना खबरदारी राखण्याचा आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.. मात्र यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे ..