भंडारा जिल्ह्यातील लाखनी वनपरिक्षेत्रात लाखोरी गावालगतच्या शेतशिवारात एकाच वेळी तीन अस्वलांचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर लाखनी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुण आणि सर्पमित्रांच्या मदतीने त्वरित कारवाई सुरू केली.