गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर रावेर तालुक्यातील मंगरूळ धरण पहिल्याच पावसात तुडुंब भरले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७ टक्क्यांवर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.