चंद्रपूर-मूल महामार्गावर 'मामा मेल' वाघाच्या शिकारीचा थरार पहायला मिळाला. भर दिवसा महामार्गावरून या वाघाने गाईची शिकार करून तिला ओढत नेलं. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी मोबाईल कॅमेरात शिकारीचं हे दृश्य कैद केलं. मूल चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात मामा मेल या अतिशय प्रसिद्ध वाघाचा अधिवास आहे. आगडी भागात काल महामार्गाच्या बाजूला त्याने गाईची शिकार केली.