नंदुरबारात २३व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मैदानावर ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा धनुर्विद्या असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.