भंडारा जिल्ह्यातील मौजा पेवठा /जवाहरनगर येथे वाघाने एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाय ठार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी तत्काळ पुढाकार घेऊन वन विभागाला पाचारण केले. वन विभागाने कॅटल किलजवळ ट्रॅप कॅमेरा लावला असता रात्री वाघाचे छायाचित्र कैद झाले.