चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरालगत असलेल्या मुंगोली खुल्या खाण परिसरात वाघाचा मुक्तसंचार सुरू असल्याने वेकोली कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री ड्युटीवर जात असलेल्या एका कामगाराला मुंगोली खुल्या खाणीकडे जाणाऱ्या मार्गावर अचानक वाघाचे दर्शन झाले.