चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात भीतीचं सावट निर्माण करणारा आणि तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे. आंबोली परिसरातील जंगलात या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात यश आलं.