भंडाऱ्याच्या कोका अभयारण्यात सध्या टी-16 ही वाघीण पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या जंगल सफारीदरम्यान या वाघिणीचे दर्शन वारंवार होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही वाघीण एका जलाशयावर तहान भागवताना दिसून आली. वाघिणीसोबतच इतर जंगली प्राणी विविध प्रकारचे पक्षीही पर्यटकांना सहज पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यामुळे तहान भागवण्यासाठी हरण, वन्यजीव जलाशयांच्या परिसरात येत असल्याने त्यांचे दर्शन सुलभ झाले आहे.