दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला.