अंबरनाथमध्ये मांजरीला १२ व्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नसून या मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमींनी अंबरनाथमध्ये कँडल मार्च काढला.