आज दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे विविध साहित्य परळी शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र, यंदा बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत असून, साहित्य विक्रेत्यांमध्ये ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.