पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 24 तासांपासून पुणे-मुंबई महामार्गावर 30 किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. याचा एक ड्रोन व्हिडिओ समोर आला आहे. यात पुण्यावरून मुंबईला जाणारी लेन पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसत आहे.