येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी, व्यापारी, बाजार समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. टोमॅटोच्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मालाला समाधानकारक बाजारभाव मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालं.