अहिल्यानगर : टोमॅटोचे आगार म्हणून ओळखले जाणारे उंचखडक गाव आज अक्षरशः हतबल झाले आहे. शेकडो एकरांवरील उभे टोमॅटो पीक शेतकऱ्यांनी जनावरांच्या चा-यासाठी उपटून टाकल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली आहे.. एका कॅरेटमागे अवघा 50 रुपये बाजारभाव मिळत असल्याने तोडणीचा खर्चही निघत नसल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याच शेतकऱ्यांनी म्हटले आहे...