राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या तापमानाचा पारा घसरला आहे. तापमानाचा पारा तब्बल ८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. गारठा वाढल्याने तोरणमाळचा यशवंत तलाव परिसरात पसरली दाट धुक्याची चादर पसरली आहे. सातपुड्याचा दुर्गम भागात सातत्याने तापमानात घट होत आहे.