मिनी महाबळेश्वर म्हूणन ओळख असलेला आंबोली पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असत. दाट धुक, थंडगार वातावरण तिथलं पर्यटकांना आकर्षण असतं.त्यामुळं वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल आंबोलीकडे पर्यटकांची पाऊले नेहमीच वळताना पाहायला मिळतायत.विकेंड असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे दाखल झालेत. आंबोली मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी, चौकुळ-कुंभवडे बाबा धबधबा येथे पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.