सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू असून पर्यटक सागरी सफरींची मजा लुटत आहेत. या पर्यटकांना डॉल्फिनचे दर्शन पर्वणीच ठरत आहे. सध्या वेंगुर्ला, निवती या सागरी पट्ट्यात सकाळी आणि संध्याकाळी डॉल्फिनचे दर्शन होत असून पर्यटक बोटीत बसून या डॉल्फिन दर्शनाची मजा लुटताना दिसून येत आहेत.