पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात आज पावसाचा जोर कमी असला तरीही पर्यटकांचा आकर्षक असलेल्या भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पावसाचा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहे. त्यामुळे चिक्की व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. दरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात प्रशासनाकडून देण्यात येत.