बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातून निघणाऱ्या पाण्याशी मस्ती करणे एका पर्यटकाला चांगलंच अंगाशी आलं. या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या तरुणाला त्याच्या सोबतच्या साथीदार आणि इतर पर्यटकांच्या मदतीने वाचवण्यात आलं. या व्यक्तीला इतर पर्यटकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे. या भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात मात्र अशी मस्ती ही पर्यटकांच्या जीवावर बेतते.