गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मुरदोली जंगल परिसरात पर्यटकांना 'T-14' नावाच्या वाघाचे दर्शन झाले.... सफारीवर निघालेल्या पर्यटकांचे वाहन समोर येताच या वाघाने आक्रमक रूप धारण केले. रागाच्या भरात असलेल्या या वाघाने पर्यटकांना पाहून जोरदार डरकाळी फोडली, पर्यटकांनी याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.....