नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात, गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये नववर्षानिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. पर्यटक नवीन वर्षाचं स्वागत करतानाच निसर्गाचा आनंद देखील घेत आहेत.