मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवताली दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती होईपर्यंत राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शिवपुतळा पाहण्यासाठी त्याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.