सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथे आज सकाळपासून पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. रविवार सुटीचा दिवस असल्याने आंबोलीत कोल्हापूर, गोवा, कर्नाटकासह पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. मुख्य आकर्षण असलेला आंबोली घाटातील धबधब्यांचे हे रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी वीकेंडला आंबोलीत पर्यटकांचा महापूर आलेला पाहायला मिळतोय.