नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद येथील धबधब्यावर पर्यटकांचा जीवावर बेतलेला थरारक प्रसंग समोर आला आहे. काल सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्यात पर्यटक अडकले. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मानवी साखळी करून 8 ते 9 पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या सुटकेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, पर्यटकांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.