माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगावात नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक वावडी उडवण्याचा खेळ रंगला. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या या खेळाची भुरळ आजच्या तरुणाईलाही कायम आहे. आठ-दहा फुटांपासून तब्बल २०-२५ फुटांच्या रंगीबेरंगी वावड्या आकाशात झेपावताना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली....