खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना आज वाशीम तालुक्यातील बाभुळगाव येथे शेतकऱ्यांना पारंपरिकदृष्ट्या पावसाचे सूचक मानला जाणारा ‘मृग किडा’ आढळून आला. मृग किड्याचे दर्शन होताच गावातील शेतकऱ्यांनी त्याचे पूजन करून आगामी पावसाबाबत आशावाद व्यक्त केला.