धाराशिवच्या परांडा इथं लाल मातीतील कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. दोनशेहून अधिक कुस्त्यांचं मैदान पार पडलं. या मैदानात इराण येथील पहिलवानही कुस्तीसाठी उतरला. मात्र त्याला पुण्यातील काकासाहेब पवार तालमीतल्या रविराज चव्हाण या पट्ट्याने धूळ चारली. तर डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या हर्षद सदगीरची कुस्ती पंजाबच्या कोटला आखाड्यातील पैलवानासोबत बरोबरीवर सुटली.