राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त नाव्हा शेवा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शंभरहून अधिक हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच सिग्नल जंप टाळा, ट्रिपल सीट नको, रॉंग साईड नको, 18 वर्षांखाली वाहन चालवू नये, हेल्मेट व सीटबेल्ट अनिवार्य अशा नियमांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.