मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे महाविद्यालयासमोर ट्रक उलटल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मुंबई- गोवा महामार्गावरील गटारावरचे स्लॅब तुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. सिमेंटचे ब्लॉक वाहून नेणारा आयशर ट्रक गटारात चाक अडकून बसल्याने उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.