छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झाली. घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमदार प्रशांत बंब यांनी परिस्थितीची पाहणी करत थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.