मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव बाजारपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही माणगाव, इंदापूर आणि लोणेरे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.