गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.विशेषतः गोंदिया शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल लागल्यामुळे नागरिकांना भर उन्हात बराच वेळ उभे राहावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांना दुपारच्या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेतली आहे. जिल्हा वाहतूक शाखा पोलिसांनी दुपारी 12:30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे नागरिकांना कडक उन्हात चौकात थांबावे लागत नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे जिल्हा वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.