मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज पुन्हा एकदा मंदावला आहे. बोरघाटात वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत. ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत केली जात आहे. चैत्र नवरात्रनिमित्त भाविक लोणावळा लगतच्या आई एकविरा देवीच्या गडावर निघालेत. अशातच आज रामनवमीची सुट्टी आहे. यानिमित्ताने मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडलेत. परिणामी द्रुतगती मार्ग मंदावला आहे. बोरघाटात नेहमीप्रमाणे वाहतूक संत गतीने पुढे सरकत आहे. चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेऊन, वाहतूक सुरळीत केली जात आहे.