ठेकेदाराकडून पगार वेळेत मिळत नाही, दिला तरी अर्धवट देतो, पगार वाढवत नाही, आहे तोही पगार मिळत नाही या मागणीसाठी परिवहन कर्मचारी यांनी आज आंदोलन पुकारले. परिवहन कर्मचाऱ्यांनी अचानक बंद पुकारल्यामुळे सकाळपासून महापालिकेच्या सर्व बस सेवा ठप्प झाली आहे.