माळशेज घाटात पाऊस आणि धुक्यामुळे समोरून येणारी वाहनं दिसत नसल्याने घाटातील प्रवास हा अतिशय जीवघेणा झाला आहे. घाटातील दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंती आणि कठडे यांच्यावर रिफ्लेक्टर लावावं तसंच रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्याची मागणी प्रवासी करत आहेत.