भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात रात्रीच्या सुमारास पत्तेदार वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यालगत वाघ फिरताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाघ दिसल्याने वाहनधारकांमध्ये काही काळ घबराट पसरली. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.