करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखा उपक्रम राबवला आहे. लग्न करून सासरी जाणाऱ्या नव्या नवरीच्या आणि नवरदेवाच्या हस्ते गावात वृक्षारोपण करून त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात पर्यावरणाच्या साक्षीने करण्याची नवीन प्रथा उंदरगाव ग्रामपंचायतीने सुरू केली आहे.