यावल तालुक्यात सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने संपूर्ण परिसराला जबरदस्त तडाखा दिला. वृक्ष उन्मळून पडणे, केळी बागांचे मोठे नुकसान आमदार अमोल जावळे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वादळामुळे यावल-भुसावळ, यावल-फैजपूर यांसह अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या सूचनेनंतर वृक्ष हटविण्याचे काम हाती घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.