गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. गावात २० विहीर आणि ४० बोअरवेल पैकी एकाही बोअरवेलमध्ये थेंबही पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्या अंतर्गत झिंगानुर चेक १,झिंगानुर चेक २, लिंगापूर टोला, रामाजीगुडम या भागात गंभीर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या गावातील जवळपास ४०० कुटुंबांपैकी २५० कुटुंब पाण्यासाठी दीड किलोमीटर पायपीट प्रवास करून पाणी आणावे लागत आहे.