देशभरातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड (धनेगाव) येथे दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त पाच दिवस चालणारी प्रसिद्ध कचारगड यात्रा 30 जानेवारीपासून सुरू होत असून 3 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.