सातपुड्याच्या कुशीतील ऐतिहासिक काठीच्या राजवाडी होळीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट दिली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाचे महत्त्व ओळखून, मंत्र्यांनी या परिसराच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.या निधीतून भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. पुढच्या होळीपर्यंत या सुविधा पूर्ण करण्याचे माझे वचन आहे, असे आश्वासन उईके यांनी दिले. यावेळी आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी आणि जिल्हा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पारंपरिक धनुष्य-बाण देऊन मंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या निधीमुळे आता काठीच्या होळीला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे.