नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम पाड्यांवरील नागरिकांची रेशनसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वेटलीबारपाडा, सेनिकीपाडा, पीपलटेंबाडा, गोरीखालपाडा आणि टेंबरीगव्हाणपाड्यातील नागरिकांची व्यथा मांडली. पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांना रेशन आणताना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.