उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुण्याच्या भोरमध्ये दुकाने बंद ठेवून दादांना श्रद्धांजली देण्यात आली.तालुक्यातील व्यापारी वर्गाने कोणत्याही आवाहनाशिवाय स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यामुळं दरवेळी गर्दीने गजबलेला असणाऱ्या भोरच्या मुख्य बाजारपेठेच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.