नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 22 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे हा यामागचा उद्देश असून, राज्यशिष्टाचारी व्यक्ती वगळता इतर व्हीआयपींना धर्मदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.