यवतमाळच्या वणी तालुक्यातील बेलोरा ते घुग्गुसला जोडणाऱ्या वर्धा नदीच्या पुलावरून कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक नदीपात्रात कोसळला. 100 फूट खाली कोसळल्याने ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.