नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील लासलगाव–पिंपळगाव (बसवंत) मार्गावरील रेल्वे पुलाला ट्रकची धडक बसून स्लॅबचे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने पुलाखाली हाइट गेज बसवण्याचे काम सुरू केले आहे. उंची कमी झाल्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद पडल्या असून ट्रॅक्टर वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.